Nashik News : यंत्रमागधारकांना प्रतियुनिट अनुदान देण्यास विरोध नाही; वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती

Nashik News : २७ अश्‍वशक्तीपेक्षा कमी जोडणी असलेल्या यंत्रमागांना एक रुपया युनिटप्रमाणे, तर २७ पेक्षा जास्त असलेल्या यंत्रमागधारकांना ७५ पैसे युनिटनुसार अनुदान.
Guardian Minister Dada Bhuse in discussion with Textiles Minister Chandrakant Patil in Mumbai.
Guardian Minister Dada Bhuse in discussion with Textiles Minister Chandrakant Patil in Mumbai.esakal
Updated on

Nashik News : २७ अश्‍वशक्तीपेक्षा कमी जोडणी असलेल्या यंत्रमागांना एक रुपया युनिटप्रमाणे, तर २७ पेक्षा जास्त असलेल्या यंत्रमागधारकांना ७५ पैसे युनिटनुसार अनुदान देण्यासंदर्भात विभागीय स्तरावरील सचिवांचा विरोध असल्याचे बोलले जात असल्याचे निरर्थक आहे. या अनुदानाला सचिवांचा विरोध नसल्याची स्पष्टोक्ती वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. (Nashik News)

आढावा समिती सदस्य, वस्त्रोद्योग विभाग, वीज कंपनी व कामगारांच्या संयुक्त बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी यंत्रमाग समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दादा भुसे, मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आदी उपस्थित होते. शासनाने येथील यंत्रमागधारकांसाठी समिती गठित केली होती.

समितीने शहरातील यंत्रमागधारकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर येथील यंत्रमागधारकांना २७ अश्‍वशक्तीपेक्षा कमी जोडणी असलेल्यांना एक रुपया युनिट, तर त्यापेक्षा जास्त असलेल्यांना ७५ पैसे प्रतियुनिट अनुदान देण्याचे जाहीर केले होते. (latest marathi news)

Guardian Minister Dada Bhuse in discussion with Textiles Minister Chandrakant Patil in Mumbai.
Nashik Police : ‘रॅश-ड्रायव्हिंग’, ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ विरोधात कारवाईचा बडगा! शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई होणार

आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल म्हणाले, येथील खासगी वीज वितरण कंपनीतर्फे यंत्रमागधारकांना नवीन कनेक्शन दिले जात नाही.

तसेच येथे अनेक ट्रान्स्फॉर्मर ओव्हरलोड सुरू आहे. नवीन वीज उपकेंद्र सुरू केल्यानंतरच वीजजोडणी दिली जाणार असल्याचे कंपनीतर्फे सांगितले जाते. यांसह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

Guardian Minister Dada Bhuse in discussion with Textiles Minister Chandrakant Patil in Mumbai.
Nashik Dada Bhuse : जिल्हा बॅंक सक्तीच्या वसुलीविरोधात लवकरच बैठक : भुसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.