esakal | ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या नऊशेच्‍या आत
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

Nashik : ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या नऊशेच्‍या आत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्‍या काही दिवसांत नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या अधिक राहत आहे. यातून उपचार घेणाऱ्या सक्रिय रुग्‍णसंख्येत मोठी घट झाल्‍याची दिलासादायक बाब आहे. मंगळवारी (ता. २८) जिल्ह्यात ६१ रुग्‍णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर ९१ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. दोघांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या नऊशेपेक्षा कमी झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात ८८५ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

मंगळवारी नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ३९ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले आहे. तर नाशिक महापालिका क्षेत्रातील १९, मालेगावचे दोन व जिल्‍हा बाहेरील एका रुग्‍णाचा कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आला. ९१ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. दिवसभरात उपचारादरम्‍यान दोघा बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद असून, दोन्‍ही मृत नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत.

प्रलंबित अहवालांच्‍या संख्येत पुन्‍हा वाढ झालेली आहे. सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार ४४३ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यापैकी एक हजार ०१७ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. नाशिक शहरातील २७६, मालेगावच्‍या दीडशे रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती.

दिवसभरात आढळणार्या संशयित रुग्णांच्या संख्येत घट झालेली आहे. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २८० रुग्‍ण दाखल झाले. यापैकी २६५ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात एक, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात चार रुग्‍ण दाखल झाले. मालेगाव व नाशिक ग्रामीणमधील प्रत्‍येकी पाच रुग्‍णांचा समावेश होता.

loading image
go to top