नाट्य संघांच्या अंतिम टप्प्यातील रंगीत तालीम

नाट्य संघांच्या अंतिम टप्प्यातील रंगीत तालीम
Published on: 
मेन फोटो :H35006 -- तब्बल २३ नाट्य संघ भिडणार महामुकाबल्यात कसून तालमींनंतर रंगकर्मी अंतिम तयारीमध्ये व्यस्त; उद्यापासून पडदा उघडणार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : सांस्कृतिक नगरी नाशिकमध्ये ६५व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेचा पडदा सोमवार (ता.१६) पासून अधिकृतपणे उघडत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चाललेल्या तालमींनंतर सर्व नाट्य संस्था आता अंतिम टप्प्यातील तयारीमध्ये व्यस्त असून, नाशिकच्या नाट्यविश्वात उत्साहाचे वातावरण आहे. यंदाच्या स्पर्धेत शहरातील तब्बल २३ नाट्य संघ उतरले आहेत. ऑगस्ट महिन्यात स्पर्धेची प्रवेशिका भरल्यापासूनच नाटकाच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळते. योग्य संहितेची निवड करणे, पात्रांनुसार योग्य कलाकारांची जुळवाजुळव करणे आणि तंत्रज्ञांची फळी उभारणे या प्राथमिक सोपस्कारांनंतर खरी कसोटी सुरू होते. बहुतांश कलाकार नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सांभाळून नाटकात भाग घेत असल्याने तालमीच्या वेळा जुळवणे मुख्य आव्हान असते. गेल्या दोन महिन्यांत संहिता वाचन, पात्रांचे स्वभाववैशिष्ट्य समजून घेणे, देहबोली, संवादफेक आणि दिग्दर्शकीय बदल यांवर कसून काम करण्यात येते. पात्रांच्या प्रवेशानुसार वेळ ठरवून रोज दोन ते तीन तास तालमी घेतल्या जात आहेत. शहराच्या विविध भागांतील सभागृहे आणि मोकळ्या जागांवर या तालमींचे सत्र सुरू आहे. प्रत्येक दिग्दर्शकाची काम करण्याची पध्दत वेगवेगळी असते. त्यानुसार ते कलावंतांकडून काम करवून घेतात. नाटकाचा संघ तयार हाेताे तेव्हा, तालमी करताना एक सख्य निर्माण हाेते. तालमीच्या स्थळी सहलीसारखे वातावरण निर्माण न हाेता त्याची काळजी प्रकर्षाने घेतली जाते. अति तालमींमुळे प्रयाेग कंटाळवाणा हाेण्याची शक्यता असल्याने संघातील सर्वांच्या कलाने नाटकांच्या तालमी घेतल्या जात असल्याचे नाट्य दिग्दर्शक सांगतात. -- कोट दिवसभर तालमी करण्यापेक्षा दिवसातून तीनच तास तालीम करतो पण मनापासून करतो. अतितालमी झाल्या की, प्रयोग रटाळ होण्याची शक्यता आणि स्पर्धेच्या दिवशी प्रयोग फसण्याची शक्यता असते. -राजेश शर्मा, नाट्य दिग्दर्शक --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.