जागतिक रंगमंचावर नाशिकच्या इंग्रजी नाटकाचा डंका

जागतिक रंगमंचावर नाशिकच्या इंग्रजी नाटकाचा डंका
Published on: 
फोटो : H35047 जागतिक रंगमंचावर नाशिकच्या नाटकाचा डंका अभिनाट्य शैलीचा ऑस्ट्रेलिया, अमेरिकेत प्रयोग सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : शहराला नाट्य संस्कृतीची मोठी परंपरा लाभलेली असून, हाच समृद्ध वसा पुढे चालवत नाशिकची निर्मिती व कलावंतांचा संघ असलेल्या ‘निकाज कोकोन’ या इंग्रजी नाटकाचा पहिलाच परदेशी दौरा मार्च २०२७ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे होत आहे. ऑस्ट्रेलियात तिकिटांची आगाऊ विक्री सुरू झाली असून, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर हे नाटक अमेरिका आणि जगभरातील विविध देशांमध्ये सादर केले जाणार आहे. विसाव्या शतकातील रशियाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली ही कथा एका बारा वर्षांच्या मुलीच्या प्रवासाभोवती फिरते, जिथे ती शाळेत जाण्याऐवजी विटांच्या कारखान्यात काम करते. पुढे लिओ टॉल्स्टॉय समुदायात गेल्यानंतर तिला मैत्री, शिक्षण, सर्जनशीलता आणि स्वातंत्र्याने भरलेले एक वेगळे जग गवसते. या नाटकाचे लेखन पुण्याच्या हिमानी नीलेश यांनी केले असून, नाशिकचे प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक जयेश आपटे यांच्या ‘रावी प्रॉडक्शन’ व ‘स्टेज क्राफ्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रयोग सादर केले जाणार आहेत. परदेशात इंग्रजी नाटक सादर होण्याचा हा पहिलाच अनुभव असून, सध्या कलावंतांचा संघ ऑनलाइन पद्धतीने सराव करीत आहे. --- ‘अभिनाट्य’ शैलीचे नवे प्रयोग नाट्यक्षेत्रात सध्या नवनवीन प्रयोग केले जात असून, या नाटकात ‘अभिनाट्य’ (अभिनय आणि नाट्य शैली) ही संकल्पना राबवली जात आहे. नाटक, नृत्य किंवा चित्रपटातून आशय आणि भावना थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ही एक विशिष्ट कलात्मक पद्धत आहे, ज्यामध्ये दिग्दर्शक विशेष प्रयोग करीत असतो. नाट्य रसिकांसाठी हा एक अतिशय आगळावेगळा आणि समृद्ध अनुभव असणार आहे, असा विश्वास दिग्दर्शक जयेश आपटे यांनी व्यक्त केला आहे. नाशिकच्या कलाकारांच्या या आंतरराष्ट्रीय झेपमुळे जागतिक स्तरावर मराठी नाट्यनिर्मितीचा आणि कलागुणांचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.