.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अंदरसूल : नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील येथील जीवन फर्निचर मॉलचे पाठीमागील शटर वाकवून चोरट्यांनी दोन सुरक्षारक्षकांना मारहाण करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी (ता. १०) सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे चोरट्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मॉलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी लावलेले तीन डीव्हीआर व वायफायचे अडपेटर काढून नेल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. (Theft of goods worth lakhs of rupees by ambushing security guards at Andarsul )