
नाशिक : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने बहुतांश शासकीय कामांचे मूल्य शंभर रुपयांवरून थेट पाचशे रुपयांपर्यंत वाढविले आहे. या निर्णयापूर्वी छपाई झालेल्या शंभर रुपयांचे ‘स्टॅम्प’ त्वरित संपवावेत यासाठी स्टॅम्पवेंडरला आग्रह केला जात आहे. लवकरच त्यांची छपाई सरकार बंद करणार असल्याची चर्चा या विक्रेत्यांच्या वर्तुळात सुरू झाली आहे. मुद्रांक विक्रीतून शासनाने उत्पन्नवाढीसाठी शंभर व दोनशे रुपयांचे मुद्रांक बंद करण्याचा अप्रत्यक्षपणे निर्णय घेतला आहे.