Nashik News : गोधनाच्या हक्काच्या घरात चाराटंचाई! पिंपळगांव उज्ज्वल गो-शाळेला हवी आहे मदत

Nashik : एक-दोन जनावरे सांभाळायची म्हटली तरी नाकीनऊ येतात. मात्र, दुष्काळाच्या स्थितीत येथील उज्ज्वल गोशाळेत ६०० गोधनाचे संगोपन केले जात आहे.
Due to shortage of fodder in Ujjwal Goshala, the problem of satisfying the hunger of animals has arisen.
Due to shortage of fodder in Ujjwal Goshala, the problem of satisfying the hunger of animals has arisen.esakal

Nashik News : एक-दोन जनावरे सांभाळायची म्हटली तरी नाकीनऊ येतात. मात्र, दुष्काळाच्या स्थितीत येथील उज्ज्वल गोशाळेत ६०० गोधनाचे संगोपन केले जात आहे. सध्या सर्वत्र चाराटंचाईचा फटका येथील गोशाळेलाही बसतो आहे. संस्था चालकांना शोधूनही पुरेसा चारा मिळत नसल्याने पोटभर अन्न गोधनाला मिळत नाही. गोधनाच्या हक्काच्या घरात पुरेशा वैरणीची गरज आहे. (Nashik There is shortage of food in pimpalgaon goshala marathi news)

पिंपळगावपासून तीन किमी अंतरावर चिंचखेड रस्त्याला अठरा वर्षापूर्वी प. पू. प्रितीसुधाजी यांच्या प्रेरणेने उज्ज्वल गोशाळेची मुहुर्तमेढ रोवली गेली. पिंपळगाव कांदा व बेदाणा व्यापारी, परिसरातील दानशुर व्यक्तींच्या सहकार्याने गोधनाचा सांभाळ केला जातो. कत्तलीसाठी जाणारी जनावरे गोरक्षक पकडून उज्ज्वल संस्थेत देतात. शिवाय भाकड जनावरे सांभाळण्याची परिस्थिती नसलेले शेतकरीही गोधन येथेच सोपवितात. आता गाई, बैल असे ६०० जनावरे येथे आहेत.

दररोज आठ टन चाऱ्याची गरज

६०० जनावरांसाठी दररोज आठ टन चाऱ्याची गरज आहे. पण, परिसरातील उसकाढणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे बांडी मिळत नाही. त्यातच शेतकऱ्यांनी यंदा पाण्याअभावी पुरेशी चाऱ्याची लागवड केलेली नाही. जनावरांची भूक भागविण्यासाठी लागणारा पुरेसा चारा मिळविण्यासाठी संस्था चालकांना भटकंती करावी लागत आहे.  (latest marathi news)

Due to shortage of fodder in Ujjwal Goshala, the problem of satisfying the hunger of animals has arisen.
Nashik News : 5 दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा; शिवपुरी चौकातील महिला वर्गात संतप्त भावना

घास, मका, उस, भुसा असा चारा दिला जातो. जनावरांची तहान भागविण्यासाठी दोन पाण्याचे हौद बांधण्यात आले आहेत. जनावरांच्या देखभालीसाठी सात कामगार आहेत. आजारी जनावरांना वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तत्काळ उपचार केले जातात. दिवसाकाठी ३५ ते ४० हजार रूपयांचा खर्च गोशाळेच्या व्यवस्थापनाला लागतो.

गोशाळे बनले पर्यटन स्थळ

गोधनाचे जीवनचक्र समजावून घेण्यासाठी अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांची उज्ज्वल गोशाळेला सहल येत असते. गोशाळेचे रूपडे पालटत असून, सध्या ते पर्यटनस्थळ बनले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नातून ४० लाख रूपये निधीतून सभागृह उभारले जाणार आहे. कबुतर खाना हे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सरपंच भास्कर बनकर यांनी ग्रीन जीम व हायमास्टची सुविधा गोशाळेच्या प्रांगणात उभारली आहे. प्रवेशद्वाराच्या नुतनीकरणाने झळाळी मिळाली आहे.

''हिंदु परंपरेत गोमातेला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे गोधन न विकता चांगल्या पद्धतीने संगोपन करावे, ही आपली संस्कृती आहे. उज्ज्वल गोशाळेत ६०० गोधनासाठी चाऱ्याची टंचाई भासत आहे. कोणत्याही अनुदानाशिवाय कांदा, बेदाणा व्यापारी व दानशुरांच्या मदतीने गोशाळेचे काम चालते.''- महावीर भंडारी, विश्‍वस्त, उज्ज्वल गोशाळा, पिंपळगाव बसवंत

Due to shortage of fodder in Ujjwal Goshala, the problem of satisfying the hunger of animals has arisen.
Nashik News : उपनगर चौकात संतप्त जमावाकडून रास्तारोको; आक्षेपार्ह पोस्टवरून वाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com