Health Centersesakal
नाशिक
Nashik Health Centers : जिल्ह्यातील 43 आरोग्य केंद्रे होणार स्मार्ट; रुग्णसेवेचा दर्जा उंचावणार
Latest Nashik News : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सध्या कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सध्या कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तंत्रज्ञानाची जोड घेत या केंद्रांचे रूपांतर ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रां’मध्ये केले जात आहे. साताऱ्याच्या धर्तीवर जिल्ह्यातील ४३ प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट होणार आहेत. या केंद्रांना मूलभूत सुविधा अत्याधुनिक स्वरूपात पुरविल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून त्याबाबतची कामे सुरू झाली आहेत. (There will be 43 health centers in district to raise standard of smart patient care )