एकलहरे- राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह निमित्त नाशिक औष्णिक विद्युत केंद्रात आजपासून ११ मार्चपर्यंत सुरक्षितता सप्ताह साजरा केला जात या असून यात घोषवाक्य, निबंध, कविता, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.४) ५४ व्या सुरक्षितता सप्ताहाला प्रारंभ झाला.