नाशिक : औष्णिक वसाहत मोजतेय अंतिम घटका

नाशिक औष्णिक वीज केंद्राची वसाहतीचा बहुतांश भाग मोडकळीच्या अवस्थेत
Nashik Thermal Power Station
Nashik Thermal Power Station

एकलहरे : औष्णिक वीज केंद्राची वसाहत आजमितीला शेवटची घटका मोजत आहे. भविष्यात येथील वीज प्रकल्प येईल, ही आशा मावळली आहे. नाशिक औष्णिक वीज केंद्राची वसाहतीचा बहुतांश भाग मोडकळीच्या अवस्थेत आली आहे. अनेक इमारतींच्या दरवाजे, खिडक्या चोरीला गेल्या आहेत, तर काही इमारती झाडाझुडपांच्या वेढ्यात लपल्या आहेत.

नाशिकमधील सरकारी वसाहतींची जी अवस्था आहे, तीच परिस्थिती एकलहरे वसाहतीची झाली आहे. सुमारे 1200 च्या वर असणाऱ्या सदनिका पैकी 80 टक्के रिकाम्या आहेत. रतन इंडिया सिन्नरचा प्रकल्प जर महानिर्मितीने घेतल्यास या वसाहतीत कर्मचारी राहतील व एकलहरे ते गुळवंच बसच्या माध्यमातून ये जा करतील, असे प्रस्तावित आहे. मात्र, या वसाहतीतील नवीन इ, जुनी एफ, टाइप थ्री, जुनी इमधील अनेक इमारती ऑडिटमध्ये जुन्या झाल्यामुळे तोडण्याचे आदेश आहेत. बहुतांश भाग रिकामा व वापर नसल्याने इमारतींचे बरेचसे साहित्य चोरीस गेले आहे.

Nashik Thermal Power Station
घरगुती वादातून जावयाने सासूला ढकलले विहिरीत

खोल्या खाली करण्याचे आदेश

वसाहत आजमितीला ऐंशी टक्के रिकामी आहे. जे काही कंत्राटी कामगार कंत्राटदारांच्या नावावर वसाहतीत सदनिका घेऊन राहत होते. त्यापैकी अनेकांना सदनिका खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे अथवा स्टॅण्डर्ड रेटने भाडे भरा, असे आदेश काढण्यात आले आहेत. एकीकडे वसाहत रिकामी झाल्याने इमारतींचे साहित्य चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. कंत्राटी कामगारांना सरकारी दरात सदनिका दिल्यास त्या इमारतींचे नुकसान तरी होणार नाही, असे एका कामगाराने सांगितले. भविष्यात या वसाहतीचा वापर जर रतन इंडियाला जोडून होणार असेल तर जुन्या व ऑडिटमध्ये निर्धारित केलेल्या इमारतींच्या जागेवर नवीन इमारती उभ्या राहतील का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत च आहे.

Nashik Thermal Power Station
नागपूर : ग्रंथालय, शिक्षण विभागात ७४ लाखांची बोगस बिले

निवृत्तीनंतरही वापर

उच्च पदावरील प्रभारी उपमुख्य अभियंता तथा अधिक्षक अभियंता, बहुतांश मेन्टेनन्स सेक्शनचे कार्यकारी अभियंते वा तत्सम उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी वसाहतीत राहणे बंधनकारक असताना हे अधिकारी शहरात राहून कामावर येतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना ने-आण करण्यास प्रशासकीय वाहनांचा वापर केला जातो. तर काही जणांकडून तर घरगुती कामांसाठी सर्रास वाहनांचा वापर केला जातो व कंपनीला मात्र भुर्दंड सोसावा लागतो. या प्रकाराची गंभीर दखल मुख्य कार्यालयाने घेतली पाहिजे, अशी येथील लोकभावना आहे. सेवानिवृत्त उपमुख्य अभियंत्याने तर ६ महिन्यांपासून बंगला व वाहनाचा निवृत्तीनंतरही वापर करणे सुरूच ठेवले आहे.

''वसाहतीतील काही सदनिका जुन्या झाल्याने त्या सदनिकात राहणाऱ्या कंत्राटी कामगारांना सदनिका खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.''

- चंद्रशेखर बाभरे, अधीक्षक अभियंता (स्थापत्य)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com