Nashik Code of Conduct : यंदा वर्षभर राहणार आचारसंहिता! लोकसभेची निवडणूक संपताच विधानपरिषद

Code of Conduct : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असताना यंदाचे संपूर्ण वर्ष हे विविध निवडणुकांच्या आचारसंहितेत पार पडणार आहे.
Code of Conduct
Code of Conductesakal

Nashik Code of Conduct : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असताना यंदाचे संपूर्ण वर्ष हे विविध निवडणुकांच्या आचारसंहितेत पार पडणार आहे. लोकसभेची आचारसंहिता ६ जूनपर्यंत लागू असताना मतदानानंतरच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित होण्याची शक्यता आहे. साधारणत: जुलैमध्ये या जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. दिवाळीत विधानसभेची निवडणूक आणि त्यानंतर जिल्हा परिषद, महापालिकेची निवडणूक होईल. (Nashik This year code of conduct will be for whole year marathi news)

त्यामुळे वर्षभरातील वेगवेगळ्या निवडणुकांच्या आचारसंहितेचा विकासकामांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ अर्थात विधानपरिषदेची सहा वर्षांची मुदत येत्या जून २०२४ मध्ये संपुष्टात येणार आहे. या जागेसाठी नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार येथील शिक्षक मतदान करतात. गेल्या वेळी येवल्याचे किशोर दराडे यांनी बाजी मारली होती.

यंदाच्या निवडणुकीत अनेक जण इच्छुक आहेत. त्यांनी आत्तापासूनच प्राचाराला सुरवात केली आहे. नाशिकमधील विभागीय आयुक्त कार्यालयाने ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२३ या कालावधित शिक्षक मतदारांची नोंदणी केली. २३ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १७ हजार ९६३, अहमदनगर (१३४२१), जळगाव (११२९९), धुळे (७३९२) व नंदुरबारमध्ये ३४४३ मतदारांची नोंदणी झाली आहे.

प्रारुप यादीविषयी शिक्षकांनी अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. त्यांचे निरसन करुन अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्यात साधारणत: दोन मतदान केंद्र असतील. एक हजार मतदारांसाठी एक केंद्र याप्रमाणे निवडणूक विभागाने नियोजन केले आहे. विधानपरिषदेची ही निवडणूक पार पडल्यानंतर पावसाळ्यातच विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरु होईल. (latest marathi news)

Code of Conduct
Nashik Code of Conduct: कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांचे कोम्बिग ऑपरेशन! आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर पिंपळगावी वाहन तपासणी

दिवाळीच्या सुमारास ही निवडणूक होईल आणि त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकांची रणधुमाळी सुरु होईल. हा संपूर्ण कालावधी लक्षात घेतला तर प्रत्येक निवडणुकीस एक-दोन महिन्याचा अवधी लागेल. वर्षभरात तीन ते चार निवडणुका दृष्टीपथात असल्याने वर्षभराचा कालावधी आचारसंहितेत जाणार असल्याने विकासकामांना मान्यता देण्यासाठी फारच कमी कालावधी मिळतो.

जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक

लोकसभा, विधानसभा, विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुका होतील. दोन वर्षांपासून येथे प्रशासकीय राजवटीत कामकाज सुरु आहे.

''विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. लोकसभेची निवडणूक संपताच विधानपरिषदेची निवडणूक घोषित होऊ शकते. त्यानंतर विधानसभेची तयारी करावी लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त कालावधी हा आचारसंहितेत जाईल, असे दिसते.''- डॉ.शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी (जिल्हा निवडणूक विभाग, नाशिक)

Code of Conduct
Lok Sabha Code of Conduct : दीड कोटींच्या साड्या वापराविना पडून! मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न फसला

प्रारुप मतदार यादी

जिल्हा............पुरुष.......महिला......एकूण

नाशिक.......१०८३६.......७१२७........१७९६३

धुळे............५६५४..........१७३८.........७३९२

जळगाव......८४१३..........२८८६.........११२९९

नंदुरबार.......२५७५.........८६८............३४४३

अहमदनगर...९६३७.......३७८४.........१३४२१

एकूण..........३७११५........१६४०३......५३५१८

Code of Conduct
Nashik Lok Sabha Code of Conduct : आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा : रवींद्र जाधव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com