Nashik News : दिंडोरीत गतवर्षापेक्षा यंदा सोयाबीनने घेतली आघाडी! तालुक्यात 22706. 40 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दीष्ट

Nashik News : गेल्या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र चार हजार ५७१हेक्टर पेरणी क्षेत्र उद्दिष्ट असताना यावर्षी सोयाबीनने आघाडी घेत सहा हजार ६२३.८५ हेक्टर पेरणी क्षेत्राचे उद्दिष्ट पुर्ण करण्याच्या तयारीत आहे.
soybeans
soybeans esakal

दिंडोरी : तालुक्यात मृग नक्षत्र लागताच हलक्याशा सरींचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे तालुक्यातील जनतेत चैतन्य निर्माण झाले असून खरीप हंगामाच्या पुर्व तयारीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराजा आता शेतीकामात व्यस्त असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र चार हजार ५७१हेक्टर पेरणी क्षेत्र उद्दिष्ट असताना यावर्षी सोयाबीनने आघाडी घेत सहा हजार ६२३.८५ हेक्टर पेरणी क्षेत्राचे उद्दिष्ट पुर्ण करण्याच्या तयारीत आहे.

त्यामुळे यंदा सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. तालुक्यात यंदा २२ हजार ७०६ .४० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, मागील खरिप हंगामात २२हजार ४७१.९३ एवढे पेरणी उद्दिष्ट पुर्ण करण्याच्या विचारात शेतकरी दिसत आहेत. (Nashik This year soybeans took lead in Dindori than last year)

मागील खरीप हंगामात सोयाबीन, मका, भात आदी पिकांनी बाजी मारली होती.परंतु नंतरच्या काळात अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे उत्पादनाच्या सरासरीवर परिणाम झाला होता. मोठ्या कष्टाने शेतकरी वर्गाने ही पिके वाचवली होती.तालुक्यात पालखेड, ओझरखेड, तिसगाव, पुणेगाव, वाघाड, करंजवण अशी सहा मोठी धरणे असल्याने दिंडोरीची धरणांचा तालुका अशी वेगळी ओळख आहे.

तसे येथील शेतकरी कष्टाळू असल्याने भात, नागली, वरई, खुरासणी आदी पिके घेण्यासाठी पश्चिम पट्ट्यातील शेतकरी सरसावला आहे. सध्या मशागतीची कामे आटोपून जास्त पर्जन्यवृष्टी केव्हा होईल याची शेतकरी आतूरतेने वाट पाहत आहेत. आठवडे बाजारात बियाणे उपलब्ध झाले असून बियाण्याच्या किंमतीत पिशवीमागे ६०ते ७० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होणारा कर्ज पुरवठा कमी पडतो आहे.अद्याप कर्ज वसुली न झाल्याने गावातील सोसायटीच्या माध्यमातून होणारा कर्जपुरवठा थांबलेला आहे. यावर्षी पीक विमा कंपनी यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. (latest marathi news)

soybeans
Nashik News: नादगावला पर्जन्याच्या नोंदी जुन्याच पद्धतीने! स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे बसविण्याबाबत यंत्रणेची उदासीनता कायम

पावसाळ्याच्या पुर्वी जनावरांना लसीकरण काही प्रमाणात करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून टोमॅटो पिकाला समाधानकारक भाव नाही तरीसुद्धा यावर्षी टोमॅटो पिकाचे क्षेत्र वाढणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

"भुईमूग पिकांचे प्रकल्प राबविले जाणार आहेत.तसेच गावोगाव जाऊन बियाणे बीज प्रक्रिया, सोयाबीन बियाणे उगवण क्षमता, चाचणी प्रात्यक्षिक घेतली जाणार आहेत.पेरणी कशी करावी याचे आवाहन करण्याचे कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.तालुक्यात खते व औषधे पुरेसा प्रमाणात उपलब्ध आहेत. नैसर्गिक आपत्ती पासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी एक रुपया पिक विमा काढण्याचे आवाहन तालुक्यातील शेतकऱ्यांना केले जाते आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत विविध फळबाग लागवडीसाठी ३५०हेक्टर चे लक्ष साध्य केले जाणार आहे."-विजय पाटील, तालुका कृषी अधिकारी, दिंडोरी

"तालुक्याच्या पूर्व भागात द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात असल्याने तालुक्याच्या ठिकाणी द्राक्ष संशोधन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले जावेत. शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची गरज आहे,तो कष्ट करण्यासाठी तयार आहे पण त्याला मार्गदर्शन करण्याची गरज आहे."

- सुधाकर जाधव, शेतकरी, मोहाडी

soybeans
Nashik: मालेगाव तालुक्यात 95 हजार 278 हेक्टर खरीपाच्या क्षेत्राचे उद्दिष्टे! मका, बाजरीला सर्वाधिक पसंती, त्याखालोखाल कपाशीकडे कल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com