हरित महामार्ग म्हणून विकसित केलेल्या नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यांची पावसामुळे अक्षरश: ‘चाळण’ झाली आहे. रस्त्यावरील खड्डे जगभरातून त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या जिवावरच उठले आहे. नाशिक ते त्र्यंबक रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले असून, पावसामुळे काही ठिकाणी तळे निर्माण झाली आहेत. वाहनचालकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागते. त्यामुळे अवघे ३० किलोमीटरचे अंतर पार करताना एक तासाचा अवधी लागत आहे.