Khelo India Talent Hunt: ‘खेलो इंडिया टॅलेंट हंट’‍ नोंदणीसाठी आज अखेरची मुदत! SAIच्‍या उपक्रमातून खेळाडूंना मिळणार मार्गदर्शन

Khelo India Talent Hunt : स्‍पोर्टस्‌ ॲथॉरिटी ऑफ इंडिया (साई) यांच्‍यातर्फे खेलो इंडिया टॅलेंट हंट या योजनेची अंमलबजावणी होत आहे.
Khelo India Talent Hunt
Khelo India Talent Huntesakal

Khelo India Talent Hunt : स्‍पोर्टस्‌ ॲथॉरिटी ऑफ इंडिया (साई) यांच्‍यातर्फे खेलो इंडिया टॅलेंट हंट या योजनेची अंमलबजावणी होत आहे. त्‍यासाठी इच्‍छुक व पात्रताधारक खेळाडूंना ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी करायची आहे. त्‍यासाठी मंगळवार (ता.२०) पर्यंत मुदत आहे. (nashik Khelo India Talent Hunt marathi news)

‘माय भारत’ या अभिनव उपक्रमांतर्गत खेलो इंडिया टॅलेंट हंट ही योजना राबविली जाते आहे. या माध्यमातून युवा खेळाडूंना व्‍यासपीठ उपलब्‍ध करून देताना त्‍यांच्‍यातील गुणकौशल्‍ये वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्‍न केले जाणार आहेत.

खेळाडूंना घडवण्यासाठी खेलो इंडिया टॅलेंट हंट हे व्‍यासपीठ अत्‍यंत प्रभावी ठरणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागासाठी नोंदणी करता येणार असून, त्‍यासाठी सध्याच्‍या वेळापत्रकानुसार मंगळवार (ता.२०) पर्यंत मुदत दिलेली आहे. http://mybharat.gov.in/KheloIndia या संकेतथळावर नोंदणीचे आवाहन केले आहे. (Latest Marathi News)

Khelo India Talent Hunt
HSC Exam 2024 : बारावीची लेखी परीक्षा उद्यापासून! विभागातून 1 लाख 68 हजार 636 विद्यार्थी देणार परीक्षा

सर्व स्‍तरावरील खेळाडूंना संधी

केंद्राच्‍या युवक कल्‍याण व क्रीडा मंत्रालयामार्फत राबविल्‍या जाणाऱ्या या योजनेत गुणवान खेळाडूंचा शोध घेत त्‍यांना मार्गदर्शन उपलब्‍ध करून देणे व स्‍पर्धांमध्ये चांगल्‍या कामगिरीसाठी घडविण्याचा उद्देश असणार आहे. विशेषतः सुविधांपासून वंचित राहणाऱ्या तळागाळातील खेळाडूंना त्‍यांच्‍यातील कौशल्‍याचे दर्शन घडविण्यासाठी व्‍यासपीठ उपलब्‍ध करून देण्याचा उद्देश ठेवला आहे.

Khelo India Talent Hunt
Nashik Lok Sabha Election: दिनकर पाटील यांची लोकसभेसाठी फिल्डिंग जोरात! 20 मंडलाध्यक्षांनी समर्थन दिल्याची सूत्रांची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com