Nashik News : पिंपरखेड येथील टोलवसुली कुणाच्या आशीर्वादाने? महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण

Nashik News : पायाभूत विकासाचे सूत्र पाळताना काम पूर्ण करून घेताना मापदंड व निकष याची गल्लत झाली तर अनुभवाला येते ते विदारक सत्य असते.
Patchwork done on new highway near Talegaon between Chalisgaon-Nandgaon.
Patchwork done on new highway near Talegaon between Chalisgaon-Nandgaon. esakal

नांदगाव : पायाभूत विकासाचे सूत्र पाळताना काम पूर्ण करून घेताना मापदंड व निकष याची गल्लत झाली तर अनुभवाला येते ते विदारक सत्य असते. असाच काहीसा प्रकार गाजावाजा झालेल्या जळगाव- चांदवड दरम्यानच्या नव्या राष्ट्रीय महामार्ग (NH-753 ) याबाबत घडले आहे.

कुठल्याही प्रकारच्या सुविधांची पूर्तता झालेली नसल्यामुळे कोरल असोसिएट्सतर्फे पिंपरखेड येथील टोलप्लाझावर (Toll Plaza) केवळ चाळीसगाव- नांदगाव मनमाड भागातील वाहनापुरती टोलवसुली सुरु झाली. या अचानक वसुलीमुळे अनेक वाहन चालक भांबावून गेले.

शिवसेना-युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनामुळे टोल वसुली बंद करण्यात आली, तथापि जनतेची ही लूट कुणाच्या आशीर्वादाने सुरू झाली हे अजून समोर आलेले नाही. (Nashik nyaydongri khadki road incomplete marathi news)

चांदवड ते जळगाव या दोनशे पंच्याण्णव किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण झाल्यानंतर खानदेशची भौगालिकदृष्ट्या नाशिक मुंबईशी कनेक्टिव्हिटी होऊन दळणवळण सुलभ होईल अशी अपेक्षा होती. प्रकल्पीय अहवालात जळगाव ते भडगाव ५६ किमी, भडगाव-चाळीसगाव ४६ किमी, नांदगाव चाळीसगाव ४४ किलोमीटर तर नांदगाव-मनमाड २४ किमी, मनमाड चांदवड २४ किमी अशी टप्पेनिहाय कामांची विभागणी झाली.

२०१८ मध्ये केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ५९७ कोटी रुपये गृहीत धरले. काम पूर्ण होईपावेतो त्यात वाढ झाली मात्र प्रकल्पीय आराखड्यात गृहीत धरण्यात आलेल्या अंदाजपत्रकीय तरतुदीत वेळोवेळी संशयास्पद बदल होत गेले, परिणामी राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होऊन देखील रस्त्याची लांबी रुंदी, मापदंड प्रमाणे झाली नसल्याचा वाहनधारकांचा आक्षेप आहे.

मनमाड नांदगाव व मनमाड चांदवड भागातील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले, मात्र नांदगावपासून न्यायडोंगरीपर्यत काँक्रिटीकरण झाले, त्यात अनेक त्रुटी राहून गेल्याचे दिसून येते. उखडून गेलेल्या काँक्रिटीकरणाच्या जागेवर रसायन फवारून पॅच मारले जातात व पुढे तेही उघडे पडते तर दुसरीकडे न्यायडोंगरी रोहिणी- तळेगाव- खडकीपर्यत जुन्याच राज्य मार्गाच्या अगोदरच असलेला डांबरीकरणावर मलमपट्टी करून हा रस्ता खडकी गावापर्यंत जैसे थे ठेवण्यात आला. हा डांबरीकरणाचा रस्ताही उघडून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. न्यायडोंगरी ते खडकीपर्यतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण का झाले नसावे याचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. (Latest Marathi News)

Patchwork done on new highway near Talegaon between Chalisgaon-Nandgaon.
Nashik News : नाशिक रोड रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलतोय! सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आतापासूनच होतेय सुधारणा

पिंपरखेड टोलप्लाझावरील दर

हलके वाहन : एकेरी ५०, परतीसाठी ७५, मासिक पाससाठी १ हजार ७००. जिल्ह्यातील वाहनांसाठी २५ रुपये.

मालवाहू हलके वाहन/ मिनिबस : एकेरी ८०, परतीसाठी १२५, मासिक दोन हजार ७५०, जिल्ह्यातील वाहने ४० रुपये.

ट्रक/बस : एकेरी १७५, परतीचे २६०, मासिक पाच हजार ७६०, जिल्ह्यातील वाहने ८५ रुपये

वाणिज्य वाहने : एकेरी १९०, परतीचे २८५ , मासिक ६ हजार २८५, जिल्ह्यातील वाहने ९५ रुपये

जड वाहने : एकेरी २७०, परतीचे ४०५, मासिक ९ हजार ३५, जिल्ह्यातील वाहने १३५ रुपये

अवजड वाहने : एकेरी ३३०, दुहेरी ४९५, मासिक दहा हजार ९५०, जिल्ह्यातील वाहने १६५ रुपये

"पथदीप नाही, वृक्षतोड करूनही ग्रीनटॅक्स ना भरणे यासह अनेक त्रुटी कायम असूनही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या हातमिळवणी शिवाय टोल वसुली सुरू होऊ शकत नाही हे सर्व संशयास्पद आहे."- सुमीत सोनवणे, संस्थापक युवा फाउंडेशन.

Patchwork done on new highway near Talegaon between Chalisgaon-Nandgaon.
Health Care: सावधान! आपत्कालीन गोळीने हार्मोन्समध्ये वेगाने बदल; Pills गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य नसल्याचा डॉक्टरांचा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com