
Nashik Protest : कृषी उत्पन्न वस्तूंचे जे व्यवहार मार्केट ॲक्टखाली येत नाहीत, त्यावर जबरदस्तीने बाजार फी गोळा केली जाते. मार्केट यार्डतर्फे कोणत्याही प्रकारच्या सेवा दिल्या जात नाहीत. परंतु सेस भरला नाही म्हणून कारवाई केली जाते. पूर्वी अन्नधान्यादि वस्तूंवर विक्रीकर नव्हता परंतु आता त्यावर जीएसटीदेखील लागू केला आहे. देशातील इतर राज्यामध्ये मॉडेल मार्केट ऍक्ट लागू असताना महाराष्ट्रात मात्र जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते आहे. (Traders strike on Tuesday against Oppressive Market Act GST )