NMC News : महापालिकेच्या ‘ट्रॅफिक सेल’ला अनुभवाचे वावडे! नवखा उमेदवारही कार्यकारी अभियंता पदास पात्र

Nashik News : बांधकाम, नगररचना किंवा पाणीपुरवठा विभागात कार्यकारी अभियंतापदावर काम करायचे असेल तर उपअभियंता पदावर तीन ते पाच वर्षे काम केल्याचा अनुभव बंधनकारक आहे.
NMC News
NMC Newsesakal

नाशिक : बांधकाम, नगररचना किंवा पाणीपुरवठा विभागात कार्यकारी अभियंतापदावर काम करायचे असेल तर उपअभियंता पदावर तीन ते पाच वर्षे काम केल्याचा अनुभव बंधनकारक आहे. परंतू महापालिकेत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या वाहतुक कक्षात कार्यकारी अभियंता व उपअभियंतापदावर काम करण्यासाठी कामाचा अनुभव बंधनकारक नसल्याने नव्याने महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या पदविकाधारक नवख्या उमेदवारालाही कार्यकारी अभियंता पदावर काम करता येणार आहे. (Nashik Traffic Cell of NMC marathi news)

शहराची लोकसंख्या वाढत असताना वाहनांची संख्यादेखील वाढत आहे. वाहन संख्येच्या तुलनेत रस्त्यांची लांबीदेखील वाढत आहे. वाहतुकी संदर्भातील पायाभुत सुविधा वाढतं असताना दुसरीकडे वाहतूक संदर्भात नियमांची अंमलबजावणी व सेवा सुविधा पुरवण्याचीदेखील जबाबदारी महापालिकेची आहे.

त्या अनुषंगाने महापालिकेकडून वाहतूकीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने वाहतूक समन्वय समिती गठीत करण्यात आली. वाहतूक समन्वय समितीने महापालिकेला वाहतूक कक्ष अर्थात ट्रॅफिक सेल स्वतंत्रपणे सुरू करण्याची मागणी केली होती.

मात्र महापालिकेच्या आस्थापना आराखड्यात वाहतूक कक्षासाठी पदांची निर्मिती नसल्याने वाहतूक कक्ष स्थापन करता येत नव्हता. प्रशासनाने शासनाकडे वाहतूक कक्षासंदर्भात आराखडा पाठवल्यानंतर फेब्रुवारी २०२४ महिन्याच्या अखेरीस पदांना मंजुरी दिली.

त्यात कार्यकारी अभियंता (वाहतूक नियोजन) १, उपअभियंता (वाहतूक) १, सहाय्यक अभियंता (वाहतूक) २, कनिष्ठ अभियंता (वाहतूक व नियोजन) ४ याप्रमाणे आठ पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे वाहतूक सुरक्षा कार्यकारी अभियंता व उपअभियंता पदावर काम करण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी बंधनकारक असले तरी अनुभवाची अट मात्र टाकण्यात आली नाही.

आणि पुरवठा नगररचना किंवा बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती मिळविण्यासाठी उपअभियंता पदावर तीन वर्ष काम करणे बंधनकारक आहे. उपअभियंता पदावर पदोन्नतीसाठी कनिष्ठ अभियंतापदावर पाच वर्ष काम केल्याचा अनुभव बंधनकारक आहे. मात्र वाहतूक कक्षात मोठ्या पदावर काम करण्यासाठी अनुभवाची अट नसल्याने महापालिकेच्या सेवेत नव्याने दाखल झालेल्या उमेदवारांनाही कार्यकारी अभियंता या महत्वाच्या पदावर काम करता येणार आहे. (Latest Marathi News)

NMC News
Nashik MNS News : राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर फाडले! मनसे अंतर्गत बंडाची चर्चा

वाहतुक कक्ष (ट्रॅफिक सेल)

- रस्तांवर सायकल ट्रॅक, फुटपाथ, झेब्रा क्रॉसिंगची निर्मिती.

- सार्वजनिक वाहतुकीसाठी डेपो, टर्मिनल, शेल्टरची उभारणी.

- पुल, बांधकामांची उभारणी ब्लॅकस्पॉट निर्मूलन.

- गर्दीच्या वेळी मार्गक्रमणांमध्ये बदल करणे.

- सर्वंकष वाहतुक आराखड्याची अंमलबजावणी करणे.

- वाहनतळांचा निर्मिती, वाहतुक बेटांचे सुशोभिकरण.

- सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे.

अशी आहे नवीन पदांची निर्मिती

- कार्यकारी अभियंता (वाहतूक) - १

- उपअभियंता (वाहतूक)- १

- सहाय्यक अभियंता (वाहतूक)- २

- कनिष्ठ अभियंता (वाहतूक व नियोजन)- ४

NMC News
Namami Goda Project: ‘नमामि’ प्रकल्पातही पूररेषेतील 48 स्थळे असुरक्षित! सुशोभीकरण करून करोडोचा खर्च करण्यास विरोध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com