

नाशिक : शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी सर्वच महत्त्वाच्या व वर्दळीच्या चौकांत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र त्यापैकी मोजक्याच ठिकाणी वाहतूक शाखेचा कर्मचारी हजर असल्याने इतर ठिकाणी सिग्नल लाल असो वा हिरवा, वाहने सुसाट धावतात. वाहतूक पोलिस नसलेल्या काही ठिकाणी तर सिग्नल यंत्रणा नावापुरतीच शिल्लक आहे. शहरातील वाढत्या वाहतुकीच्या गतीवर नियंत्रण असावे, वाहतूक सुरक्षित व निर्धोक व्हावी, यासाठी यंत्रणेने शहराच्या अनेक चौकांत सिग्नल बसवले आहेत.