Nashik Police Transfer: नाशिक परिक्षेत्राची जबाबदारी पुन्हा डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांच्याकडे! मुंबई उच्च न्यायालयाने दिले आदेश

Nashik News : डॉ. शेखर-पाटील यांनी बुधवारी (ता. २०) सायंकाळी पुन्हा नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारत कामकाजाला प्रारंभ केला.
Dr. B. G. Shekhar Patil
Dr. B. G. Shekhar Patilesakal

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या जानेवारी महिन्यात राज्यातील पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर-पाटील यांची बदली केली होती. त्याविरोधात त्यांनी केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाकडे (कॅट) धाव घेतली असता, कॅटने बदलीला स्थगिती देत पुन्हा नियुक्तीचे आदेश देण्याचा निर्णय दिला होता.

परंतु या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेवर सुनावणी बुधवारी (ता. २०) होऊन कॅटचाच निकाल कायम ठेवला. त्यामुळे डॉ. शेखर-पाटील यांनी बुधवारी (ता. २०) सायंकाळी पुन्हा नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारत कामकाजाला प्रारंभ केला. (responsibility of Nashik area again Dr BG Shekhar Patil marathi news)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गृहविभागाने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या गेल्या ३१ जानेवारी रोजी बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यानुसार नाशिक पोलिस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर-पाटील यांची पुणे येथे बदली केली होती. तर, ठाण्याचे सहआयुक्त दत्ता कराळे यांची नाशिकचे नवीन विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली केली होती.

या बदलीच्या विरोधात डॉ. शेखर पाटील यांनी कॅटमध्ये धाव घेत दाद मागितली होती. डॉ. शेखर-पाटील हे ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे शासकीय नियमानुसार सेवानिवृत्तीला १ वर्षे राहिल्यास अशा अधिकाऱ्यांनी बदली करू नये असे संकेत आहेत.

Dr. B. G. Shekhar Patil
Nashik Police: आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांची कठोरतेने अंमलबजावणी! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा

त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार सहा महिने सेवानिवृत्तीला राहिल्यास अशा अधिकाऱ्यांची बदली करू नये असा नियम आहे. याच नियमाला धरून डॉ. शेखर-पाटील यांनी कॅटमध्ये आपली बाजू मांडली. त्यानुसार, कॅटने ४ मार्च रोजी गृहविभागाने केलेल्या डॉ. शेखर-पाटील यांच्या बदलीला स्थगिती देत, त्यांना पुन्हा नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्याचे आदेश शासनाला दिले होते.

कॅटचाच निर्णय कायम

कॅटने दिलेल्या निर्णयाविरोधात नव्याने रूजू झालेले विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले होते. त्यावर बुधवारी (ता.२०) सुनावणी होऊन न्यायालयाने कॅटचाच निकाल कायम ठेवत डॉ. बी.जी. शेखर-पाटील यांना नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर नियुक्तीचे आदेश बजावले. त्यानुसार, डॉ. शेखर-पाटील यांनी बुधवारी सायंकाळी नाशिक परिक्षेत्र कार्यालयात हजर होत पदभार घेतला आणि प्रत्यक्ष कामकाजालाही प्रारंभ केला आहे.

Dr. B. G. Shekhar Patil
Nashik Police : शहरात टवाळखोर, पानटपऱ्यांवर धडक कारवाई; आयुक्तालय हद्दीमध्ये पोलिसांची विशेष मोहीम

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com