
Nashik Police Transfer : शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षक, सहायक व उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच वाहतूक शाखेतून अभियोग कक्षात बदली झालेले पोलीस निरीक्षक दिनकर कदम यांची शहर वाहतूक शाखेच्या युनिट दोनमध्ये बदली करण्यात आली आहे.
आगामी गणेशोत्सव व सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर युनिट दोनमध्ये वाहतूकीची समस्या उद्भवत असते. यामुळे आता दोन अधिकारी या युनिटमध्ये कार्यरत राहिल्यास वाहतुकीचे नियोजन सुलभ होण्याची शक्यता आहे. (Transfers of Police Officers in City Commissionerate)