पिंपळसोंड, श्रीभुवन चिंचपाडा येथे पर्यटन विभागातर्फे नाशिक महोत्सवाचे आयोजन. पर्यटकांची गर्दी.

पिंपळसोंड, श्रीभुवन चिंचपाडा येथे पर्यटन विभागातर्फे नाशिक महोत्सवाचे आयोजन. पर्यटकांची गर्दी.
Published on: 
पान-२ मेन ------- SUG26B03102 पिंपळसोंड (ता. सुरगाणा) ः येथे पारंपरिक बोहाडा माहिती केंद्राला भेट देताना खासदार भास्कर भगरे. संतोष रोकडे, जगदीश चव्हाण आदी. ---------- आदिवासी तालुके पर्यटनस्थळ घोषित करा खासदार भास्कर भगरे ः सुरगाण्यात आदिवासी लोककलेचा जागर; अमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सव सुरु सकाळ वृत्तसेवा सुरगाणा, ता.३ ः नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुके हे पर्यटन स्थळे म्हणून घोषित केल्यास रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील तसेच स्थानिक कारागिरांना संधी मिळेल. यातून तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी केले. पिंपळसोंड- तातापाणी येथे पर्यटन विकास महामंडळ आयोजित नाशिक फेस्टिव्हल सांस्कृतिक वारसा महोत्सवात ते बोलत होते. पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, नाशिक पर्यटन विभागाचे जगदीश चव्हाण, यामिनी मुंडावरे, मिटकाॅन पुणेचे श्रीकांत काकडे, देविदास थोरात, महेश बेले, गोंदुणे सरपंच संजाबाई खंबायत, खुंटविहीर सरपंच आनंदा झिरवाळ, रामदास केंगा, सोगी मुखवटे कलाकार माजी सैनिक शिवराम चौधरी, राकेश मुंडावरे, जल परिषदेचे देविदास कामडी, आदिवासी कला संस्कृती डांगी बोलीभाषिक रतन चौधरी, हस्तकला शिक्षक मधुकर चौधरी आदी उपस्थित होते. श्री. भगरे पुढे म्हणाले,‘सुरगाणा- पेठ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, मात्र धरणे नसल्याने स्थलांतर ठरलेले असते. लोकांना स्वतःचा रोजगार निर्माण करायचा असेल तर खाद्य संस्कृती, विविध हस्तकलेच्या वस्तू धरती आबा जनजागृती ग्राम उत्कर्ष अभियानामार्फत पर्यटन वाढवले पाहिजे. खासदार भगरे यांनी पावरी, डांगी नृत्य, बोहाडा नृत्यांसह पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेत रावणाची बांधीत ताटी नृत्यात सहभाग घेतला. महोत्सवात पारंपरिक नृत्ये, मुखवटा कला, वाद्ये आणि आदिवासी खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडत आहे. -------------- चिंचपाडा येथील महोत्सवाचे उद्घाटन आमदार नितीन पवार यांच्या हस्ते, तर पिंपळसोंड येथील उद्घाटन खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते झाले. आमदार पवार यांनी पारंपरिक डोंगऱ्यादेव महोत्सवासाठी सहकार्याचे आश्वासन दिले. पिंपळसोंड येथे आदिवासी सांस्कृतिक कलादालन वस्तू संग्रहालय उभारण्यासाठी खासदार निधीतून १० लाख रुपये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही नमूद केले. प्रादेशिक अधिकारी संतोष रोकडे यांनी पर्यटन विकासाचा निधी संबंधितांपर्यंत पोहोचतो का, याची पडताळणी करण्याची गरज व्यक्त केली. मुखवटा कला,खाद्यसंस्कृती आणि निसर्ग पर्यटन महोत्सवात बोहाडा मुखवटे बनविण्याची प्रक्रिया,पिंपळसोंड व डोल्हारे येथील मुखवटा नृत्य,पारंपरिक वेशभूषा आणि आदिवासी जीवनशैलीचे प्रदर्शन करण्यात आले.महिलांनी उभारलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर स्थानिक मसालेदार पदार्थ,रानभाज्या आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद पर्यटकांनी घेतला. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com