नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी उशिराने का होईना निधी मिळाला. घोषित झालेला निधी हा पूर्ण नाही. ज्या कामांना १५ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागेल, ती कामे प्राधान्यक्रमाने करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक निधी मंजूर होणार असला तरी तो किती प्रमाणात मिळेल, याचा अंदाज तूर्तास मंजूर निधीवरून लक्षात येतो.