Trimbakeshwar Temple Assault : भाविकाने ड्रग्ज घेतले हे ठरविणारे तुम्ही कोण? त्र्यंबकेश्वर मारहाणीवर मंत्री गिरीश महाजन संतप्त; नेमका काय प्रकार?

Devotee Assaulted at Trimbakeshwar Temple in Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. देवस्थान ट्रस्टच्या ड्रग्ज सेवनाच्या दाव्यावर गिरीश महाजन यांनी तीव्र आक्षेप घेत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
Girish Mahajan statement on temple incident

Girish Mahajan statement on temple incident

esakal

Updated on

नाशिक : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाला चार ते पाच जणांनी मारहाण केल्याच्या (Trimbakeshwar Temple devotee assault controversy) घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणानंतर देवस्थान ट्रस्टने संबंधित भाविकाने अमली पदार्थ सेवन केल्याचा दावा केल्याने वाद अधिकच चिघळला आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया देताना कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी थेट सवाल केला, ‘भाविकाने ड्रग्ज घेतले हे ठरविणारे तुम्ही कोण?’ तसेच मारहाणीच्या गंभीर प्रकारात संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल व्हायलाच हवा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik
What did Girish Mahajan say about Gokul Gite?
Trimbakeshwar Kushavarta water purification project
What is the latest update on Nashik Kumbh Mela 2027 preparations?
Marathi News Esakal
www.esakal.com