नाशिक : डॉक्टरांना अखेर पर्यायी भूखंड उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

doctor agitation

नाशिक : डॉक्टरांना अखेर पर्यायी भूखंड उपलब्ध

सातपूर : कोरोनाकाळात ऑक्सिजनची कमतरता पाहता राज्य शासनाने उद्योग विभागामार्फत त्वरित ऑक्सिजन प्रकल्पासाठी त्यांना हवे त्यांना एमआयडीसीमध्ये भूखंड उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने नाशिकमधील वीस डॉक्टर एकत्र येऊन आक्राळे (ता. दिंडोरी) येथे भूखंड मिळवला व लगेच परवानगी घेऊन बांधकामाला ही सुरवात केली. परंतु, सदर भूखंडाबाबत न्यायालयात वाद झाल्याने शुक्रवारी अखेर संबंधितांच्या मागणीनुसार पर्यायी भूखंड प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी बदलून दिला.

दरम्यान, आक्राळेत रिलायन्स, ओएनजीसी सह अजून मोठ्या प्रकल्पाचे आगमनाने आक्राळेला वेगळ महत्त्व प्राप्त झाले आहे. याच एमआयडीसीत वीस डॉक्टर एकत्र येऊन त्यांनी ऑक्सिजन प्रकल्पासाठी भूखंडाची मागणी केली होती. नियमाप्रमाणे त्यांना भूखंड नंबर ए- २४ देण्यात आला होता. परंतु, या भूखंडावर काही न्यायालयीन वाद सुरू झाल्याने संबंधितांना दुसरा भूखंड देण्याबाबत संमती दिली होती. पण दोन महिने उलटूनही दुसरा भूखंड वाटप होत नसल्याने शुक्रवारी संबंधित डॉक्टर एमआयडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलनासाठी बसले.

या वेळी आमदार सीमा हिरे यांनी दखल घेऊन प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्याशी चर्चा केली. श्री. गवळी यांनी वरिष्ठांची चर्चा करून संबंधितांना लगेचच एफ -२ हा भूखंड उपलब्ध करून दिला. संबंधितांचे तत्काळ समाधान झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. प्रकल्पाचे डॉ. नीलेश पुरकर, समीर अहिरे, ललित लवनकर, ऐ. बंडोपद्याय, विनोद पवार आदींसह इतर डॉक्टर उपस्थित होते.

संबंधितांना ऑक्सिजन प्रकल्पासाठी भूखंड देण्यात आला होता, पण त्याबाबत काही न्यायालयीन वाद उपस्थित झाल्याने त्यांना त्यांच्या मागणीनुसार वरिष्ठांशी चर्चा करून दुसरा भूखंड उपलब्ध करून दिला.

- नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

आम्हाला आज दुसरा भूखंड बदलून दिला आहे, पण त्याची मोजणी करूनच त्याबाबत निर्णय घेऊ.

- विनोद पवार

Web Title: Nashik Twenty Doctor Agitation Stopped

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top