
सिन्नर : सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाथरे शिवारात सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास दुचाकीस्वारास अडवून दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली. मारहाण करणारे दोघेजण विना क्रमांकाच्या पल्सर मोटरसायकल वरून आले होते. या घटनेत तीन हजार चारशे रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन लांबवण्यात आला. वावी पाथरे दरम्यान काही वर्षांपूर्वी दुचाकी स्वरांना अडवून त्यांना प्राणघातक मारहाण केली जायचे व त्यांच्याकडील पैसे व मौल्यवान वस्तू लुटल्या जायच्या. (Two incidents of assault on bike riders on Wavi Dusangwadi road)