dr. rahule aher and keda aher esakal
नाशिक
Nashik Vidhan Sabha Election 2024 : नानांच्या त्यागाची दादांकडून परतफेड; कार्यकर्त्यांचे काय?
Latest Election News : चांदवडमधून दादा की नाना याचा तिढा सुटला असे म्हणायला हरकत नाही. निदान नानांच्या दमदार मागणीपुढे दादांनी तूर्तास भाऊबंदकीचे कारण दिले असले तरी कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे
चांदवड ः चांदवडमधून दादा की नाना याचा तिढा सुटला असे म्हणायला हरकत नाही. निदान नानांच्या दमदार मागणीपुढे दादांनी तूर्तास भाऊबंदकीचे कारण दिले असले तरी कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे, हे एरवी प्रत्येक राजकारणी वापरत असलेल्या हुकमी एक्क्यासारख्या कारणाचे काय झाले? कार्यकर्त्यांना विश्वासात घेत डॉ. राहुल आहेर शुक्रवारी त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. तूर्तास कौटुंबिक संघर्ष टळला असे म्हटले जात असले तरी नानांची चाल दादांना फार उशिरा समजली, असे मतदारसंघात बोलले जात आहे. (two months there was confusion among BJP workers whether Dada or Nana)