
नाशिक : महापालिकेत प्रशासकीय पातळीवर नवीन सूत्रधार आल्यानंतर कामाला गती मिळाल्याचे मानले जात असले तरी विविध विभागांच्या २, ५७७ तक्रारी प्रलंबित असल्याने प्रशासकीय कामकाजाचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या पोर्टलवरील तक्रारींचा निपटारा करण्यात आला असला तरी एनएमसी ई-कनेक्ट ॲपवरील ऑनलाइन तक्रारी निकाली काढण्यात मात्र अपयश आले आहे.