
नाशिक : शहरात वाहनचोरीची मालिका सुरू असून घरासमोर पार्क केलेल्या अॅटोरिक्षासह उपनगरीय परिसरातून चोरट्यांनी चार दुचाक्या चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी पंचवटी, अंबड, सरकारवाडा, उपनगर व भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे करण्यात आला आहे. तर, दुचाक्या चोरट्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी होते आहे. भारतनगर येथील आवेश इक्बाल शेख (रा. शिवाजीवाडी) यांची ६० हजारांची अॅटोरिक्षा (एमएच १५एफयू ६१९२) गुरूवारी (ता. १२) सायंकाळच्या सुमारास नानावली येथील फेमस बेकरी भागात पार्क केलेली असताना ती चोरट्यांनी चोरून नेली. (Two wheeler thieves are continue in city)