
नाशिक : महाविकास विकास आघाडी म्हणून विधानसभेच्या निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढा, असा स्पष्ट सूचना पदाधिकाऱ्यांना देणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पराभवानंतर मात्र महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी राहणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येईल असा दावा केला व त्याप्रमाणे वातावरण निर्मिती झाली.