पान-३
-----------
OLN26A14997
नाशिक : भुयारी मार्गाची संभाव्य चित्रफीत पाहताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी
--------------
३६-४
सिंहस्थाची सर्व कामे वेळेत पूर्ण होणार
मुख्यमंत्र्यांकडून पाहणी ः नववर्षात भुयारी मार्गातून प्रवास
---------------
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक ता.११: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थानिमित्त त्र्यंबकेश्वर तसेच शहरात सुरू असलेल्या विकासकामांची रविवारी पाहणी केली. द्वारका येथील भुयारी मार्गासह घाटांचे काम उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे. सर्व कामे वेळेच्या आत पूर्ण होतील अशी ग्वाही त्यांनी द्वारका भुयारी मार्गाची पाहणी दौऱ्या दरम्यान दिली. कामांची प्रगती बघून समाधान व्यक्त केले.
----------
मुख्यमंत्री फडणवीस रविवारी (ता.११) नाशिक दौऱ्यावर होते. विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावून त्यांनी त्र्यंबकेश्वर आणि शहरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. सायंकाळच्या सुमारास श्री. फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, मोनिका राऊत यांच्यासह द्वारका भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी केली. सध्या पूर्ण झालेले काम आणि सुरू असलेले कामाचा त्यांनी आढावा घेतला.
द्वारका भुयारी मार्गाचे काम अतिशय आव्हानात्मक होते. तरीदेखील राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महापालिका, पालकमंत्री आणि इतर विविध संस्था यांच्या प्रयत्नांनी अतिशय उत्कृष्टरीत्या काम केले जात आहे. वाहतुकीची यातून मोठी समस्या सुटणार आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर तसेच इतर घाटांचे कामही योग्यरीत्या सुरू आहे. संपूर्ण कामे वेळेत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सुरू असलेल्या कामांमुळे आगामी दिवसात त्र्यंबक आणि नाशिकचा संपूर्ण कायापालट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. घाटांच्या झालेल्या कामांमुळे पाचपट भाविक येऊ शकतील. आधुनिक शहराच्या दृष्टीने सध्याची कामे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचण्याबाबत संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा झाली आहे. मार्गात कुठल्याही प्रकारचे पाणी साचणार नाही, याची चाचणी देखील यंदाच्या पावसाळ्यात झाली आहे. त्यामुळे पाणी साचण्याचा प्रश्न उद्भवत नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. नाशिक विमानतळाची पाहणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भुयारी मार्गाचे काम करणारे अधिकारी आणि ठेकेदारांसह प्रत्यक्ष संपूर्ण मार्गाची पाहणी करत माहिती घेतली.
................
१६-१
वडाळा नाक्याकडील काम सुरु
द्वारका भुयारी मार्गाचे महत्त्वाचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. वडाळा नाक्याकडून येणाऱ्या मार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर सुरू आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण रस्त्यांचे कामे पूर्ण होऊन १ जानेवारी २०२७ या नवीन वर्षात नवीन भुयारी मार्गातून वाहनांना प्रवेश मिळू शकेल. अशी खात्री राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संदीप पंडागळे यांनी व्यक्त केली. त्या दृष्टीने सर्वच कामांना गती देण्यात आल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.
..............
१६-१
पालकमंत्र्यांचाच केला सत्कार
भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहे. यानिमित्ताने त्यांचे भेट घेत त्यांचा सत्कार करण्याची अभिलाषा असलेले एक वृद्ध गृहस्थ शाल घेऊन भुयारी मार्गात उपस्थित होते. शेवटपर्यंत मात्र त्यांची भेट मुख्यमंत्र्यांची होऊ शकली नाही. मुख्यमंत्री गेल्यानंतर शेवटी त्यांनी ती शाल पालकमंत्र्यांच्या खांद्यावर टाकत त्यांचा सत्कार केला.
----------------