Agriculture News : नाशिकला अवकाळीने झोडपले: हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, बळीराजाच्या डोळ्यात पाणी

Rabi Crops Like Wheat and Onion Suffer Heavy Losses : नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार गारपिटीमुळे द्राक्ष बागांमधील वेली जमिनीवर कोसळल्या असून, काढणीला आलेला गहू आणि कांदा पीक पूर्णपणे आडवे झाले आहे.
Nashik Rain

Nashik Rain

sakal

Updated on

नाशिक: जिल्ह्याला बुधवारी (ता. १८) दुपारनंतर ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपिटीने झोडपून काढले. काढणीला आलेला गहू, कांदा तसेच भाजीपाला पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास एक हजार हेक्टरवरील पिकांना या अवकाळीचा फटका बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com