Nashik News : मुख्याधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा ओझरसाठी ठरतोय नुकसानकारक; अनेक प्रश्‍न प्रलंबित

Nashik News : ओझर नगर परिषदेच्या कामकाजाबाबत अधिकारी-कर्मचारी उत्साहीत असताना प्रभारी प्रशासकांचे अवेळी धोरण ओझरकरांना आजही मोठे नुकसानदायी ठरत आहे.
Ozar Municipal Council
Ozar Municipal Councilesakal

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ओझर नगर परिषदेच्या कामकाजाबाबत अधिकारी-कर्मचारी उत्साहीत असताना प्रभारी प्रशासकांचे अवेळी धोरण ओझरकरांना आजही मोठे नुकसानदायी ठरत आहे. नगरविकास खात्याच्या वरिष्ठांनी वेळापत्रक लावण्याबाबत लेखी आदेश देऊनही त्यात वार समाविष्ट करत वेळेला बगल देण्याचे धोरण अवलंबले जाऊन अखेरीस मोबाईल क्रमांकाची मोहोर उमटवल्याने नागरिक पुरते बुचकळ्यात पडले आहेत. (untimely policy of in charge administrators regarding functioning of Ozar Nagar Parishad)

येवल्याचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्याकडे ओझरचा भार आहे. नागरिकांच्या सेवेसाठी अधिकाऱ्यांना तसे वेळापत्रक बंधनकारक असताना वर्षभरापासून ते लावलेच नसल्याची बाब समोर आली. यामुळे हजारो नागरिकांच्या अनेक प्रश्‍नांना कुणी वाली नव्हते.

सकाळने यावर प्रकाशझोत टाकल्यावर शनिवारसह आयुक्तांनी वेळापत्रक व इतर तक्रारींबाबत लेखी उत्तर मागितल्यावर सोमवारी त्यावर छोटेखानी वेळापत्रक लावण्यात आले. यात बुधवार व शुक्रवार हे दिवस ठरविण्यात आल्याने वेळ मात्र संपूर्ण कामकाजाची की ‘नेहमीप्रमाणे कधीही येणार?’ याबाबत उत्तर मिळालेले नाही.

अंतर्गत बदल्यांचा मुहूर्त लागेना

प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या व्यस्त कामकाजामुळे ओझर वाळीत पडल्यासारखे झाले आहे. नव्याने बदलून आलेले बहुतांश अधिकारी हे सेवाभावी व सार्वजनिक प्रश्‍न सोडवणुकीबाबत अग्रेसर असताना पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांच्या अभावी अनेक बाबी प्रलंबित आहेत. यातील अनुभवी अधिकाऱ्यांनी सुरळीत कामकाजासाठी अंतर्गत बदल्या करण्याचे वारंवार सांगूनही अद्याप त्यावर मोहोर उमटली गेली नाही. यामुळेच काही मर्जीतील लोकांना यातून अभय देण्याचा संशय व्यक्त होणे क्रमप्राप्त ठरते. (latest marathi news)

Ozar Municipal Council
Nashik ZP News : असहकार आंदोलन पत्राबाबत जि.प. प्रशासक अनभिज्ञ; ग्रामसेवक युनियनचे पत्र 3 दिवस उलटूनही प्रशासनापर्यंत पोचेना

निफाडच महत्वाच्या मीटिंगचा केंद्रबिंदू!

ओझरमधील काही महत्वाच्या विषयी अथवा प्रलंबित ठेवलेल्या फाईलबाबत आजही निफाड जवळ बैठक होत असल्याचे बोलले जाते. नुकतीच ओझरमधील प्राईम लोकेशन असलेल्या एका शेतीची झालेली बिनशेतीविषयी घेतलेल्या मीटिंगची चर्चा लपून राहिली नाही.

त्यामुळे एकीकडे सामान्य ओझरकर समस्यांनी होरपळत असताना व्हाईट कॉलर लोकांना मुख्याधिकाऱ्यांची मेजवानी देखील चर्चेचा विषय ठरत आहे. सर्वच अधिकारी, कर्मचारी चांगले काम करीत असताना लाखाच्या घरात गेलेल्या ओझरला गृहीत धरण्याऐवजी सामन्यांची जान असलेला शासक कधी मिळणार, हा प्रश्‍न कायम आहे.

Ozar Municipal Council
Nashik Police : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरविल्यास कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com