
नाशिक : पावाच्या किमती वाढविणे अनिवार्य असल्याने सांगत शनिवार (ता. २५) पासून दरवाढ करण्याचा निर्णय नाशिक बेकरी असोसिएशनने घेतला आहे. साधारणतः १५ ते २० टक्के दरवाढ होणार असल्याची घोषणा संघटना पदाधिकाऱ्यांनी काशीमाळी मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर केली आहे. त्यामुळे आता मिसळ, पावभाजीवर ताव मारताना अधिकचा खिसा हलका करावा लागण्याची शक्यता आहे.