Nashik News : गिरणारेत 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार!

Nashik News : देवळाली विधानसभा मतदारसंघातील गिरणारे येथील ग्रामीण रुग्णालयाचे ३० वरून ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून शासन मान्यता दिली आहे.
hospital
hospitalesakal

नाशिक रोड : देवळाली विधानसभा मतदारसंघातील गिरणारे येथील ग्रामीण रुग्णालयाचे ३० वरून ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून शासन मान्यता दिली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने गुरुवारी (ता.७) शासन निर्णय काढला आहे. यामुळे गिरणारेसह परिसरातील गावांमधील हजारो ग्रामस्थांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार सरोज आहिरे यांनी दिली. (Nashik Upazila hospital girnare marathi news)

hospital
Raj Thackeray on NCP: "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून येणाऱ्यांची मोळी"; राज ठाकरेंचा शरद पवारांवर घणाघात

आमदार आहिरे यांनी गिरणारे ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त व्हावा. अशी मागणी १७ मार्च २०२२ रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली होती. गिरणारे येथील अस्तित्वात असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होणे अत्यावश्यक आहे.

गिरणारे परिसर हा आदिवासीबहुल आणि ग्रामीण भाग असल्याने येथील रुग्णांना उपचारांसाठी नाशिक शहरात यावे लागते. रुग्णांची हेळसांड होऊ नये तसेच त्यांना परिपूर्ण आरोग्यसेवा मिळावी, यासाठी गिरणारे ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणे अत्यावश्यक होते.

नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी राज्याचे आरोग्याचे सहसंचालक यांच्याकडे गिरणारेतील तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्याचे आवश्यक असल्याचे सांगितले होते. (Latest Marathi News)

hospital
International Women's Day Special: क्रीडा कौशल्‍ये अन्‌ सुरक्षिततेचे कवच.! 18 वर्षांपासून गीतांजली सावळे देताय खो-खो प्रशिक्षण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com