सिटीलिंकमध्ये सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद घटले

सिटीलिंकमध्ये सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद घटले
Published on: 
टूडे साठी ------------- ‘सिटीलिंक’मध्ये सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद घटले तीन महिन्यात ८ लाखांहून अधिक डिजिटल तिकिटे सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : सिटीलिंक बससेवेत सुरू करण्यात आलेल्या यूपीआय पेमेंट सुविधेला प्रवाशांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. रोख रक्कम आणि सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात होणारे रोजचे वाद आता जवळपास संपुष्टात आले असून, डिजिटल तिकिटांचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचा दावा करण्यात आला असून तीन महिन्यात आठ लाखांहून अधिक डिजिटल तिकिटे प्रवाशांनी काढले आहे. प्रवाशांचा प्रवास वादमुक्त करण्यासाठी सिटिलंक कंपनीने जून २०२६ पासून बससेवेत यूपीआय सुविधा सुरू केली. अवघ्या तीन महिन्यांत या निर्णयाचे सकारात्मक परिणाम आकडेवारीतून दिसू लागले आहेत. सिटीलिंकच्या आकडेवारीनुसार, यूपीआय सुविधा सुरू होण्यापूर्वी जून महिन्यात सुट्ट्या पैशांवरून २४ तक्रारी आल्या होत्या. जुलैमध्ये हा आकडा १९ वर, ऑगस्टमध्ये १३ वर, तर सप्टेंबरमध्ये ११ वर आला. विशेष म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या १७ दिवसांत केवळ २ तक्रारींची नोंद झाली आहे. म्हणजेच चार महिन्यांत तक्रारींमध्ये ९० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. दुसरीकडे प्रवाशांनी डिजिटल पेमेंटला पसंती दिल्याचे चित्र आहे. जूनमध्ये २२ हजार ९२० तिकिटे यूपीआयने काढली गेली. जुलैमध्ये हा आकडा थेट २ लाख ४ हजार १४९ वर गेला. ऑगस्टमध्ये ३ लाख ३२ हजार ४९९, तर सप्टेंबरमध्ये ३ लाख ३५ हजार २३२ तिकिटे मोबाईलवरून काढण्यात आली. ऑक्टोबरच्या केवळ १७ दिवसांत १ लाख ९५ हजार २०६ प्रवाशांनी यूपीआयने तिकीट काढले. --------कोट-------- डिजिटल व्यवहारांना चांगला प्रतिसाद मिळतं आहे. प्रवाशांनी यूपीआय पेमेंटचा वापर करून सुट्ट्या पैशांची चिंता टाळावी आणि स्मार्ट प्रवासाचा अनुभव घ्यावा. - विजयकुमार मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिटीलिंक -------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com