Nashik News : खिशात नव्हे, बँक खात्यात पैसा हवा! ग्रामीण भागात ‘क्यूआर कोड’चा वापर वाढला

Nashik : इलेक्ट्रॉनिक साधने बाजारात उपलब्ध झालीच. पण, डाटाही स्वस्त मिळत आहे. इंटरनेटचा वेगही जास्त असल्याने शहरी भागातील डिजिटल रुपया आता ग्रामीण भागातही चांगलाच स्थिरावला आहे.
qr code
qr codeesakal

Nashik News : इलेक्ट्रॉनिक साधने बाजारात उपलब्ध झालीच. पण, डाटाही स्वस्त मिळत आहे. इंटरनेटचा वेगही जास्त असल्याने शहरी भागातील डिजिटल रुपया आता ग्रामीण भागातही चांगलाच स्थिरावला आहे. आता पैसे खिशात ठेवून दुकानात जाण्याची गरज नसल्याने अगदी चहा, पानटपरी, दूधवाल्याकडेही ‘क्यूआर कोड’ उपलब्ध झाला आहे. गेल्या पाच वर्षांत ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. (nashik use of QR Code has increased in rural areas marathi news)

पूर्वीच्या तुलनेत सध्या ऑनलाइन व्यवहारावरच सर्वाधिक भर दिला जात आहे. त्यामुळे रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत. संसारोपयोगी महागडे साहित्य, विविध साहित्यांपासून अगदीच दहा-वीस रुपयांना मिळणारी वस्तू, खाद्यपदार्थ खरेदी करायची असली तरी क्यूआर कोड स्कॅन केला जात आहे. रोखीने होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण जेमतेम १० ते २० टक्के असून, आता खिशात नव्हे, तर बँकेच्या खात्यात पैसा असायला हवा, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यानुसार, ठराविक मुदत देऊन नागरिकांकडे असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करून घेण्यात आल्या. नंतर त्या चलनातून कायमच्या बाद करण्यात आल्या. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने ऑनलाइन व्यवहारास चालना मिळाली. (latest marathi news)

qr code
Nashik News : शाळकरी मुलाची दहाव्या मजल्यावरून उडी; मानसिक नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज

ऑनलाइन व्यवहाराला चालना देण्याची घोषणा शासन स्तरावरून करण्यात आली. सुरवातीच्या काळात प्रशासकीय पातळीवरून युद्धस्तरावर जनजागृती करण्यात आली. नागरिकांनाही त्याचे महत्त्व पटले. त्यामुळे सध्या रोखीच्या व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने घटून डिजिटल पेमेंटला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.

फसवणुकीपासून सावध राहण्याची गरज

नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार आँनलाईन करत असताना पुरेपूर खबरदारी बाळगायला हवी. केवळ मोठे दुकानदारच नव्हे तर चक्क पाणीपुरी, पाववडा विकणाऱ्यांनाही ग्राहकांच्या सोयीसाठी क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. यासह भाजीपाला विक्रेत्यांना ऑनलाइन पेमेंट ट्रान्सफरचा पर्याय खुला करून देण्यात आला आहे. याबद्दल सर्वांनी फसवणूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे.

qr code
Nashik News : 9 वर्षांत 30 बिबट्यांचा मृत्यू; आजारपण, अपघातात सर्वाधिक गतप्राण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com