
नाशिक : सिडको परिसरात अनेक ठिकाणी जलवाहिनीचे व्हॉल्व उघडे पडलेले आहेत. त्यावर संरक्षक झाकण बसवलेले नाहीत. अशा व्हॉल्वद्वारे रोज नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून, रोज सकाळी आणि सायंकाळी पाणीपुरवठा करणारे कर्मचारी पाण्याचा प्रवाह सुरू करण्यासाठी व्हॉल्वचा वापर करतात. पण हे पाण्याचे व्हॉल्वला झाकण लावण्याचा त्यांना विसर पडत आहे. अशा उघड्या व्हॉल्वच्या झाकणांचा विविध ठिकाणी खच तयार झाला आहे.