
सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पूर्व भागातील बहुतांश गावे अवर्षणप्रवण मानली जातात. सिंचन सुविधेअभावी शेतीतून उत्पन्नाची शाश्वती नसल्याने येथील शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन व्यवसायात अंडी उत्पादन व विक्रीतून आर्थिक प्रगती साधली आहे. यामध्ये वावी, पांगरी, दुसंगवाडी, कहांडळवाडी, घोटेवाडी, मिठसागरे, मलढोण आदी गावात जवळपास १५०हून अधिक शेतकऱ्यांकडून लेअर पक्षांचे संगोपन केले जात आहे. त्यामुळेच हा परिसर 'अंडी उत्पादन क्लस्टर' म्हणून नावारूपास येत आहे.