Nashik News : नाशिकची अनोखी परंपरा! धुलिवंदनाला वीरांच्या मिरवणुकांनी दुमदुमली दक्षिण गंगा

Unique Tradition of 'Veer' Processions in Nashik on Dhulivandan : नवसाला पावणारे वीर म्हणून ख्याती असलेल्या दाजिबा (बाशिंगी), येसोजी, मधोबा महाराज वीर आदींचे जागोजागी भक्तीभावाने मोठ्या उत्साहात स्वागत व पूजन करण्यात आले.
Godaghat festival

Godaghat festival

sakal 

Updated on

नाशिक: शहरात वीरांच्या मिरवणुका पारंपरिक उत्साहात व भक्तीभावात झाल्या. वीरांच्या मिरवणुकांमुळे गोदाघाटाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. नवसाला पावणारे वीर म्हणून ख्याती असलेल्या दाजिबा (बाशिंगी), येसोजी, मधोबा महाराज वीर आदींचे जागोजागी भक्तीभावाने मोठ्या उत्साहात स्वागत व पूजन करण्यात आले. अनेक ठिकाणी सडारांगोळीने वीरांचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांसह वाजंत्रीच्या गजराने गोदाघाट दुमदुमून गेला होता. रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका सुरू होत्या. ग्रहणामुळे अनेक ठिकाणी रात्री उशिरा मिरवणुका काढण्यात आल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com