
चांदोरी : बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चांदोरी ते चेहडीपर्यंत शेतकऱ्यांसाठी विविध अकरा भाजीपाला कलेक्शन सेंटर उभारले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची विक्री करताना मध्यस्थांच्या खर्चापासून सुटका मिळाल्याने त्याचा परिणाम थेट उत्पन्न वाढीवर झाला आहे. या कलेक्शन सेंटरचे महत्त्व शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून उत्पादनासाठी चांगला दर मिळत असल्याने भाजीपालासह इतर ही शेतमाल विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे.