
नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. नागरी भागात ‘वोटोबा’ शुभंकर तयार करून गर्दीच्या ठिकाणी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. हा ‘वोटोबा’ नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. जिल्ह्यात स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या सनियंत्रणाखाली शहरी व ग्रामीण भागात स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. (Vetoba is doing voting awareness in district administration is dynamic for maximum voting )