Pune University : रोजगारक्षम शिक्षणक्रम सुरु करणार : कुलगुरू डॉ. गोसावी

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्राची वाटचाल संथ असली तरी योग्‍य दिशेने सुरु आहे.
Vice-Chancellor Dr. Suresh Gosavi. Officers
Vice-Chancellor Dr. Suresh Gosavi. Officers esakal

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या ( Pune University ) नाशिक उपकेंद्राची वाटचाल संथ असली तरी योग्‍य दिशेने सुरु आहे. येत्‍या शैक्षणिक वर्षापासून एमबीएसोबतच बीबीए हा पदवी अभ्यासक्रम तसेच परदेशी भाषांचे प्रशिक्षण दिले जाईल. तर येत्‍या काळात औद्योगिक कंपन्‍या, शैक्षणिक संस्‍थांच्‍या सहकार्यातून रोजगारक्षम शिक्षणक्रम सुरु करण्यावर भर राहणार असल्‍याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी शुक्रवारी (ता.१५) दिली. (nashik Employable education program will be started marathi news)

नाशिक दौऱ्यावर आलेल्‍या कुलगुरू डॉ. गोसावी यांनी उपकेंद्र कार्यालयात माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, नाशिक उपकेंद्राचे सहायक कुलसचिव श्रीपाद बुरकुले आदी उपस्‍थित होते. कुलगुरू डॉ. गोसावी म्‍हणाले, की सद्यस्‍थितीत विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्राकडून एमबीए आणि एमबीए एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम सुरु आहेत.

उपकेंद्राच्‍या शिवनईतील बांधकाम पूर्ण झाल्‍यास जूनपासून या प्रांगणात अध्ययन प्रक्रिया सुरु करण्याचा भर असेल. बीबीए हा पदवी अभ्यासक्रम नव्‍याने सुरु केला जाणार आहे. परदेशात रोजगाराच्‍या मोठ्या संधी उपलब्‍ध असून, या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना परदेशी भाषांचे प्रशिक्षण उपकेंद्रामार्फत देण्याचा मानस आहे.

तसेच परिसरातील भौगोलिक गरज लक्षात घेता, स्‍थानिक स्‍तरावर रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध होतील, असे अभ्यासक्रम आगामी काळात सुरु करण्यावर भर दिला जाईल. यामध्ये कृषी संलग्‍न शिक्षणक्रम, वाइन उद्योग व इतर कौशल्‍याधीष्ठीत शिक्षणक्रमांचा समावेश असेल. (latest marathi news)

Vice-Chancellor Dr. Suresh Gosavi. Officers
Pune University : विद्यापीठ चौकाला दिलासा! पोलिसांकडून वाहतुकीत बदल, विद्यापीठात मिलेनियम गेटमधून प्रवेश

उपकेंद्रात सुरु करणार रिसर्च पार्क फाउंडेशन

उद्योजकता वाढीस लागावी, तसेच नवउद्योजकांना पेटंटपासून अन्‍य बौद्धिक संपदा निर्माण करण्याच्‍या उद्देशाने पुणे विद्यापीठाअंतर्गत रिसर्च पार्क फाउंडेशन कार्यरत आहे. या धर्तीवर नाशिक उपकेंद्राच्‍या प्रांगणात रिसर्च पार्क फाउंडेशन सुरु करण्याचा मानस कुलगुरू डॉ. गोसावी यांनी व्‍यक्‍त केला.

कुलगुरू डॉ.गोसावी म्‍हणाले..

* उपकेंद्राचे प्रश्‍न स्थानिक स्‍तरावर सोडविले जातील

* ‘लोकल इज व्‍होकल’ संकल्‍पनेवर नवीन शिक्षणक्रमांची निर्मिती

* विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी पोर्टलवरच नोंदणीकृत कंपन्‍यांची माहिती उपलब्‍ध करणार

* शास्‍त्रज्ञ, विषय तज्‍ज्ञांचे पुणे, नगर व नाशिक उपकेंद्रात प्रत्‍येकी २५ व्‍यक्‍तींचे मार्गदर्शन उपलब्‍ध करणार

* ‘विद्यापीठ आपल्‍या दारी’च्‍या धर्तीवर विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार

* दर तीन महिन्‍यांनी प्राचार्य, संस्‍थाचालकांसोबत सहाय्यक कुलसचिव घेणार बैठक

* स्‍वयंनिर्वाही अभ्यासक्रम सुरु करण्यावर भर

Vice-Chancellor Dr. Suresh Gosavi. Officers
Pune University : पीएच.डी. प्रवेशात आता मराठा आरक्षण ; विद्यापीठाकडून कार्यवाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com