Nashik News : स्‍टार्टअप्‍ससाठी ‘दिशा’ संशोधनासाठी ‘दृष्टी’ मार्गदर्शक : कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर

Nashik : रौप्यमहोत्‍सव साजरे केल्‍यानंतर आता महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाची वाटचाल व्‍यापक स्‍वरूपात सुरू झाली आहे.
Vice Chancellor Dr Madhuri Kanitkar
Vice Chancellor Dr Madhuri Kanitkar esakal

Nashik News : रौप्यमहोत्‍सव साजरे केल्‍यानंतर आता महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाची वाटचाल व्‍यापक स्‍वरूपात सुरू झाली आहे. विद्यापीठाने ‘डिपार्टमेंट ऑफ इनोव्‍हेशन ॲन्ड सिस्टि‍म फॉर हेल्‍थकेअर असोसिएशन’ (दिशा) ची स्‍थापना करताना याद्वारे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन, स्‍टार्टअप्‍सला मार्गदर्शन उपलब्‍ध केले आहे. ‘डिव्हिजन ऑफ रिसर्च इन इंटरडिसिप्‍लिनरी सायन्‍सेस हेल्‍थकेअर ॲन्ड ट्रान्‍सलेशनल इनोव्‍हेशन’ (दृष्टी) द्वारे युवा संशोधकांना प्रोत्‍साहन योजना राबविली जात आहे. (Nashik Vice Chancellor Dr Madhuri Kanitkar statement marathi news)

राष्ट्रीय संस्‍थांसोबत करार करत ‘दृष्टी’द्वारे आणखी व्‍यापक संधी उपलब्‍ध होतील. या प्रकल्पामुळे वैद्यकीय क्षेत्रात अमूलाग्र बदल घडतील, असा विश्‍वास महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्‍यक्‍त केला. २३ व्‍या दीक्षान्त समारंभानिमित्त ‘सकाळ’सोबत संवाद साधताना कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी विद्यापीठाच्‍या वाटचालीचा आढावा घेतला.

कुलगुरू डॉ. कानिटकर म्‍हणाल्‍या, की नाशिकमधील महाराष्ट्र पदव्‍युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन संस्‍थेत सध्याच्‍या सात विद्याशाखांसोबत आणखी नवीन सात शाखांतून पदव्‍युत्तर शिक्षण उपलब्‍ध केले जाईल. नाशिकमध्ये शंभर प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (एमबीबीएस) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करण्याबाबत नॅशनल मेडिकल कमिशनला प्रस्‍ताव सादर केला आहे.

‘दृष्टी’साठी एक कोटीचे अनुदान प्राप्त झाले असून, पाचशेपेक्षा जास्‍त संशोधकांना नामांकित संस्‍थांसोबत संशोधन सुविधा उपलब्‍ध केली आहे. ‘दिशा’च्‍या माध्यमातून स्‍वतंत्र कंपनी स्‍थापन करून स्‍टेट इनोव्‍हेशन सोसायटीकडून अर्थसहाय्य लाभत आहे.

Vice Chancellor Dr Madhuri Kanitkar
Nashik News : गोष्ट एका ‘रेशनकार्ड’ची! तहसीलदारांच्या समयसूचकतेने वाचला रुग्णाचा जीव

२० हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

दीक्षान्त समारंभात पदवीचे दहा हजार ३०२, पदव्‍युत्तर पदवीच्या सहा हजार ५५२ विद्यार्थ्यांसह ११३ पदविका आणि पीएच. डी. धारक २६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल. विद्यापीठाशी संलग्‍न शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित असे एकूण ५६९ महाविद्यालये आहेत. पदवीचे शिक्षण ४१ हजार ५१८ आणि पदव्‍युत्तर पदवीचे सात हजार ६८३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

बीडीएस, फिजिओथेरपीचे ब्‍लूप्रिंट लवकरच

अभ्यासक्रमात सुसूत्रता आणण्यासाठी विद्यापीठाने एमबीबीएस अभ्यासक्रमाच्‍या प्रसिद्ध केलेल्‍या ब्‍लूप्रिंटचे नॅशनल मेडिकल कमिशनने कौतुक केले. विद्यापीठातर्फे ‘बीडीएस’च्‍या अभ्यासक्रमाचे ब्‍लूप्रिंट साकारले असून, फिजिओथेरपी अभ्यासक्रमाच्‍या ब्‍लूप्रिंटची प्रक्रिया सध्या सुरू आहे, असे कुलगुरू डॉ. कानिटकर म्‍हणाल्‍या.

एन्‍ट्रान्‍सशिप योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ

नावीन्‍यपूर्ण समर एन्‍ट्रान्‍सशिप प्रोग्रामद्वारे पदवीच्‍या विद्यार्थ्यांना उन्‍हाळी सुट्यांमध्ये प्रत्‍यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. सातशेहून अधिक विद्यार्थ्यांनी योजनेत सहभाग नोंदवत उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. वर्गात मिळणाऱ्या शिक्षणापलीकडे अनुभवातून शिक्षणाची संधी याद्वारे विद्यार्थ्यांना मिळाली.

तसेच पदव्‍युत्तर पदवीच्‍या विद्यार्थ्यांच्‍या एन्‍ट्रान्‍सशिपसाठी ‘ॲक्‍सलरेटेड क्‍निनिकल एक्‍सपिरियन्‍स प्रोग्राम’ सुरू करण्याचे प्रस्‍तावित आहे. ‘नर्सिंग इनस्‍टील कॉम्पेन्टेन्सी एनरिचमेंट प्रोग्राम’ ही योजना नर्सिंगच्‍या पदवी स्‍तरावरील विद्यार्थ्यांना एंट्रान्‍सशिपची संधी देण्यासाठी राबविली जाईल.

Vice Chancellor Dr Madhuri Kanitkar
Nashik News : शिक्षण नसतानाही प्रशिक्षणाने घडविल्या उद्योजिका! मोलमजुरीच्या कामातून मुक्तता

कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी अधोरेखित केलेले मुद्दे

- ऑनलाइन ऑनस्‍क्रीन मूल्‍यमापनामुळे दोन दिवसांच्‍या विक्रमी वेळेत निकाल जाहीर करणे झाले शक्‍य.

- नॅशनल ॲकॅडमी डिपॉसिटरीच्‍या पोर्टलवर एक लाख ८३ हजार ८७३ विद्यार्थ्यांचे पदवी अपलोड, डिजिलॉकरवर उपलब्‍ध

- ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा साकारला एबीसी आयडी

- आंतरविद्यापीठीय आविष्कार स्‍पर्धेचे यशस्‍वी आयोजन

- इतका व्‍यापक सहभाग असलेल्‍या स्‍पर्धेचे विद्यापीठाच्‍या इतिहासात प्रथमच आयोजन

- माजी विद्यार्थ्यांच्‍या संघटनेची स्‍थापना, अधिकृत संघटनेद्वारे मार्गदर्शन, संवाद घडविणे झाले सुलभ.

- विद्यापीठ परिसरात महाविद्यालय इमारत, वसतिगृह, हॉस्‍पिटल आदी पायाभूत सुविधांची होणार उभारणी.

- सेंटर ऑफ एक्‍सलन्‍सचा साकारला जातोय ‘डीपीआर’.

- विद्यापीठाच्‍या प्रत्‍येक विद्यार्थ्याला डिजिटल लायब्ररी सुविधा उपलब्‍ध.

- मुंबई विभागीय केंद्र, आयआयटी पवईच्‍या सामंजस्‍याने ‘मेड-टेक हब’ उभारणीची प्रक्रिया सुरू.

- व्‍हिजन डॉक्‍युमेंटच्या पूर्ततेवर आगामी काळात असेल भर. (latest marathi news)

Vice Chancellor Dr Madhuri Kanitkar
Nashik News: नांदगाव शहरातील गाळ्याच्या लिलावात पालिकेला कोटीचा महसूल! उत्पन्नात ५ कोटी ५५ लाखाची भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com