

Nashik Vidhan Sabha Election 2024 News : राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांनी शुक्रवारी (ता. १८) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. देवळाली विधानसभा मतदारसंघातून पुत्र माजी आमदार योगेश घोलप यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विनंती केली. (Nashik Vidhan sabha 2024 Former MLA Gholap Sharad Pawar meeting)