Prof. Devyani Farande meeting voters. Musheer Syed, a candidate for the underprivileged, campaigning in the central constituencyesakal
नाशिक
Nashik Vidhan Sabha Election: ‘मध्य’मध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत प्रचाराचा जोर; प्रचाराचा ज्वर थंडावला, छुप्या घडामोडींकडे लक्ष
Latest Nashik News : नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवारांकडून शेवटच्या मिनिटापर्यंत प्रचाराचा ओघ सुरू होता.
नाशिक : नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवारांकडून शेवटच्या मिनिटापर्यंत प्रचाराचा ओघ सुरू होता. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना उमेदवार, त्यांच्या समर्थकांकडून गाठी-भेटीवर जोर दिला. प्रचाराचा ज्वर सोमवारी (ता. १८) थंडावला, मात्र छुप्या घडामोडींकडे उमेदवारांसह यंत्रणेचेही लक्ष राहणार आहे. नाशिक मध्य मतदारसंघात छोट्या-मोठ्या अशा जवळपास ३८ झोपडपट्या आहेत. तसेच गावठाण भागात दाट लोकवस्ती आहे. (Vidhan Sabha Election campaigning in central till last moment attention is paid to hidden developments )