

नाशिक : मतदारयादीतील नाव शोधण्यासाठी निवडणूक यंत्रणेने ऑनलाइन उपलब्ध करून दिलेली सुविधा, मतदान केंद्राचा शोध घेण्यासाठी वाढणारा मोबाईल अॅपचा वापर याचा थेट परिणाम यंदा मतदार स्लीप वाटपावर झाल्याचे दिसत आहे. मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असतानादेखील निवडणूक आयोगासह राजकीय पक्षाकडून केले जाणारे स्लीपचे वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. बुधवारी (ता. २०) मतदान होत असल्याने एकच दिवस स्लीप पोचविण्यासाठी शिल्लक आहे. (door to door Voter Slip Distribution Incomplete in city )