
नाशिक : शहरातील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास तेरा माजी नगरसेवकांनी बंडखोरीचे निशाण फडकवल्यानंतर बंडखोरीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. त्यामागे शिवसेनेला मिळालेल्या विकासनिधीची देखील खदखद आहे. शिवसेनेच्या आमदारांना थेट निधी मिळाला. मात्र भाजपच्या सिडको-सातपूर भागातील नगरसेवकांना निधी मिळाला नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. महायुतीच्या जागावाटपात नाशिक शहरातील नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम व नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाटेला जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.( Shiv Sena corporator got it but not BJP corporators is ironic )