
नाशिक : विधानसभा निवडणुकीत ८५ वर्षांवरील नागरिकांना घरातूनच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ६० हजार ५४६ मतदारांना या सुविधेचा लाभ घेणे शक्य असून, त्यांनी बीएलओंशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. (Voters above 85 years of age in district will vote at home appeal to contact BLO )