Nashik Vidhansabha Election 2024 : विधानसभा मतदारसंघात उदंड झाले ‘सर्वेकरी’! सर्वच पक्षाकडून उमेदवारांच्या चाचपणी सुरू

Latest Political News : आगामी निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील राजकीय स्थिती कशी असेल, उमेदवार कोण असतील, मुख्य लढती कोणासोबत होतील, तालुकानिहाय उमेदवारांचा आकडा किती असे शकेल, यासह इतर राजकीय माहितीसाठी काही सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी शहरात व तालुक्यात गोपनीय पाहणी करीत आहेत.
Vidhansabha Election 2024
Vidhansabha Election 2024esakal
Updated on

Nashik Vidhansabha Election 2024 : दीड ते दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रत्येक मतदारसंघात सर्वेतून निवडणुकीचे चित्र कसे असणार, कोणता उमेदवार चालेल, याची चाचपणी राजकीय पक्षांनी खासगी संस्थांमार्फत सुरू केली आहे. शहर व जिल्ह्यात डझनभर विविध संस्थांचे प्रतिनिधी मतदारसंघनिहाय मतदारांचा कल कसा असेल, याबाबत जाणून घेत असल्याचे दिसत आहे. (Vidhansabha Election 2024 Survey people rampant in assembly constituency)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com