Nashik News : सराफांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसात ‘दक्षता समिती’; चोरीच्या सोने खरेदी गुन्ह्यात पोलिसांना नियमांची बंधने

Nashik : चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी सराफी व्यावसायिकांना पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागते.
gold shop (file photo)
gold shop (file photo)esakal

Nashik News : चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी सराफी व्यावसायिकांना पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागते. त्यातून अनेकदा निर्दोष सराफांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. यासंदर्भात पोलिस महासंचालक कार्यालयात राज्यस्तरीय दक्षता समिती तर, पोलिस आयुक्तालय व पोलिस अधीक्षक कार्यालयात दक्षता समितीची स्थापना करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे. तसेच, अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना पोलिसांना मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Nashik Vigilance Committee in police for security of goldsmith marathi news)

या अधिसूचनेमुळे राज्यातील सराफ व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चोरीचे सोने खरेदी-विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांकडून सराफ व्यावसायिकांना अटक करून चौकशी केली जाते. गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जाते. त्यासंदर्भात गेल्या काही वर्षांपासून सराफ व्यावसायिकांकडून शासनाकडे मागणी होती. त्यानुसार, गृहविभागाने गुरुवारी (ता.१४) परिपत्रक जारी केले आहे.

त्यानुसार, पोलिस महासंचालक कार्यालयात राज्यस्तरीय दक्षता समिती, तर पोलिस आयुक्तालय व पोलिस अधीक्षक कार्यालयात दक्षता समिती करणे, या समितीची राज्यस्तरावर वर्षातून एकदा तर, आयुक्तालय-अधीक्षक कार्यालयांतर्गत तीन महिन्यांनी एकदा बैठक घेणे, सोने चोरीच्या गुन्ह्यात अटक संशयिताची पंच समक्ष चोरीच्या मुद्देमालाची चौकशी करणे, सराफाची चौकशी करताना त्यांच्याकडील नोंदवहीत नोंद करावी, तपासी अधिकारी याच्याशिवाय दुसऱ्या कोणीही कार्यवाही करू नये. ( latest marathi news )

gold shop (file photo)
Nashik News : वृद्ध कलावंत, साहित्यिक मानधन योजनेसाठी 20 पर्यंत मुदत

कार्यक्षेत्राबाहेर कारवाई असेल तर थेट सराफाच्या दुकानात न जाता पोलिस आयुक्तालय वा अधीक्षक कार्यालयाने नेमलेल्या दक्षता समितीच्या निदर्शनास सदरची बाब आणून दिल्यानंतर पुढील कारवाई करावी, सराफाकडे चोरीचा माल हस्तगत करण्यापूर्वी संबंधित आयुक्तालय, पोलिस अधीक्षक कार्यालय वा स्थानिक गुन्हे शाखेला अवगत करणे, सराफाचा जबाब त्याच्या दुकानातच नोंदवावा, आवश्यकता असेल तरच अटक करावी, स्थानिक साक्षीदारांच्या उपस्थितीमध्येच झडती घ्यावी, सराफांना गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नये, अशा सूचनांचे पालन करण्याबाबत पोलिसांचा सूचित करण्यात आले आहे. गृहविभागाचे उपसचिव राजेश गोविल यांनी सदरचे परिपत्रक जारी केले आहे.

सराफांनाही सूचना

सराफी व्यावसाय करणाऱ्यांची अद्ययावत यादी स्थानिक पोलिस ठाण्यास द्यावी

दागिने विक्री वा गहाण ठेवण्यासाठी आलेल्या ग्राहकाकडून अधिकृत ओळखपत्र घ्यावे

संशयित गुन्हेगार दागिने विक्रीसाठी आल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी

सुरक्षिततेसाठी दुकानात अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी

तपासात सराफाने पोलिसांना सहकार्य करावे

gold shop (file photo)
Nashik News : लासलगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच! अधिकाऱ्यांची आंदोलनाकडे पाठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com